
पावसाची पुन्हा पाठ
मुंबई, ता. ३ : हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता; मात्र वरुणराजाने पाठ फिरवल्याने हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा चुकल्याचे दिसले. तुरळक सरींचा अपवाद वगळता आज मुंबईकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला; तरीही पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारपासून पावसाचा जोर ओसरला. रविवारी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. शहर १.१५ मिमी, पूर्व उपनगर ०.६७ मिमी, तर पश्चिम उपनगर १.०७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रविवारच्या सुटीच्या दिवशी कुटुंबीयांसह पावसाचा आनंद घेण्याच्या बेतात असणाऱ्या मुंबईकरांचा हिरमोड झाला. पावसाने पाठ फिरवल्याने कडक उन्हाचे दर्शन झाले. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली. पावसामुळे २५ अंशाच्या खाली गेलेल्या कमाल तापमानात वाढ होत ते कुलाबा ३१, सांताक्रूझ ३१.६ अंश सेल्सिअरवर पोहोचले.
.......
पुढील पाच दिवस ‘जोर’धार!
मुंबईत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ७ जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07299 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..