मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट
मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मुंबई शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलैच्या सुरुवातीलाच रुग्ण १० हजारांच्या खाली आले आहेत. मुंबईत जूनमध्ये कोविडबाधितांमध्ये वाढ झाली; परंतु महिनाअखेरीस सक्रिय रुग्णांमध्ये २५ टक्के घट झाली.
१ जून रोजी मुंबईत २,९७० सक्रिय रुग्णांची नोंद झाली. त्याच दिवशी ७३९ नवीन बाधित नोंदवले गेले. त्यापैकी १०२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जूनच्या मध्यापर्यंत शहरात दररोज दोन हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. सक्रिय रुग्णांमध्ये चारपट वाढ झाली आहे.

मुंबई पालिकेच्या अहवालानुसार शहरात १६ जून रोजी २,३६६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. १३,००५ सक्रिय प्रकरणे होती. पालिकेच्या अहवालानुसार, रविवारी मुंबईत ७,६७१ सक्रिय रुग्ण नोंदले गेले. म्हणजेच एका महिन्यात २५ टक्के घट झाली आहे. एकूण ४९१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोविड रुग्णांचा भार कमी होतोय
सक्रिय रुग्ण कमी होत आहे, हे चांगले लक्षण आहे. कोविड रुग्णांचा भार कमी होत आहे. काही दिवसांत नवीन रुग्णांमध्ये आणखी घट होईल. ताज्या जिनोम सिक्वेन्सिंग अहवालातून बीए २ आणि बीए २.३८ ओमिक्रॉन उपप्रकार हे मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे कारण आहे. परदेशातही आम्ही या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे पाहिले आणि काही आठवड्यांत त्यात घटही होत असल्याचे दिसून आले. इथेही रुग्णांमध्ये घट होत आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07300 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top