स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प रखडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प रखडणार
स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प रखडणार

स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प रखडणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे; मात्र कर्ज देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने जाचक अटी घालून ठेवल्याने मुंबई बँकेला प्रकल्पांसाठी कर्ज देण्यात अडचण निर्माण झाली आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बँकेकडून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे; मात्र निधीअभावी मुंबईतील स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये स्वयंपुनर्विकासाबाबत निर्णय घेतला आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील वाद, विकसकाकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे मुंबई-ठाणे परिसरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत; तर अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकसक पुढे येत नाहीत. त्यामुळे असे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकारी बँकांमार्फत कर्ज घेऊन प्रकल्प राबवण्यास चालना देण्यात आली. त्यानुसार अनेक संस्थांनी सहकारी बँकांकडे कर्जाची मागणी केली; मात्र यादरम्यान प्रकल्पासाठी कर्ज देण्याच्या नियमात रिझर्व्ह बँकेने बदल केले. त्यानुसार सहकारी बँकांना आता भांडवलाच्या केवळ पाच टक्के कर्ज देता येणार आहे.
सध्या मुंबई बँकेकडे स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांनुसार संस्थांनी बँकेकडे एक हजार कोटींची मागणी केली आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मुंबई बँक केवळ २५० कोटी रुपये देऊ शकणार आहे. या कर्जामध्ये दोन ते तीन प्रकल्प मार्गी लागू शकणार असल्याने इतर प्रकल्पांना कर्जपुरवठा करण्यास बँकेला अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07302 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top