कार्यालय भाडेकराराचे प्रमाण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यालय भाडेकराराचे प्रमाण वाढले
कार्यालय भाडेकराराचे प्रमाण वाढले

कार्यालय भाडेकराराचे प्रमाण वाढले

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः कोरोना साथीमुळे बऱ्याच जणांचे वर्क फ्रॉम सुरू होते; परंतु ही साथ आटोक्यात आल्यानंतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी एप्रिल ते जून तिमाहीत देशातील कार्यालयांचे भाडेकरार करण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तिप्पट वाढले आहे.
मुंबई-पुण्यासह बंगलोर, चेन्नई, हैदराबाद व दिल्ली येथे हा कल दिसत असून या कालावधीत या शहरांमध्ये एकूण दीड कोटी चौरस फुटांची कार्यालये भाडेपट्टीने देण्याचे व्यवहार नोंदवले गेले. तसेच नव्या कार्यालयांचा पुरवठाही वाढत आहे. अडीच वर्षांनंतर प्रथमच कार्यालये रिकामी राहण्याचे प्रमाणही घटल्याचे हा अहवाल तयार करणाऱ्या ‘कोलायर्स’चे सीईओ रमेश नायर यांनी सांगितले.
मुंबईत कार्यालयांचे भाडेकरार या तिमाहीत तिपटीने वाढले, तर पुण्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (दोन लाख चौरस फूट) या वर्षीच्या या तिमाहीतील व्यवहार १४ लाख चौरस फुटांवर गेले. देशात सर्वत्र एक लाख चौरस फुटांपेक्षा मोठ्या कार्यालयांना मागणी होती. हैदराबाद व बंगलौर या शहरांमध्ये झालेल्या आयटी कार्यालयांच्या व्यवहारांपैकी ६० टक्के व्यवहार हे मोठ्या कार्यालयांसाठी होते.

सावधगिरीचे पाऊल
मागील वर्षीच्या याच तिमाहीत या सहा शहरांमध्ये फक्त ५६ लाख चौरस फूट कार्यालयांचे व्यवहार झाले होते. आता मागणी वाढती असली तरीही चलनवाढ, तसेच पोलाद आदी कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे काही विकसक सावधगिरी म्हणून कार्यालयांची बांधणी पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचे ‘कोलायर्स इंडिया’चे वरिष्ठ संचालक विमल नाडार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07307 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top