सोमय्या मानहानीप्रकरणी संजय राऊत यांना समन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summons to Sanjay Raut in Somaiya defamation case
सोमय्या मानहानीप्रकरणी संजय राऊत यांना समन्स

सोमय्या मानहानीप्रकरणी संजय राऊत यांना समन्स

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यांमुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवडी न्यायालयाने सोमवारी राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले असून १८ जुलै रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील स्वच्छतागृह बांधणीत सुमारे शंभर कोटींचा गैरव्यवहार सोमय्या यांनी केला असल्याचा जाहीर आरोप राऊत यांनी केला आहे. या आधारहीन आणि खोट्या आरोपांमुळे माझी व माझ्या कुटुंबाची मानहानी झाली, असा दावा सोमय्या यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. त्यावर आज न्यायालयाने राऊत यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आज ते सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्याची मागणी सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली आणि १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश राऊत यांना दिले.

सोमय्या यांच्याकडून खंडन
किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यावरून संजय राऊत यांच्या विधानांमुळे मानहानी झाली, असे प्रथमदर्शनी दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये नोंदवले होते. राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर आणि त्यांच्या संस्थेवर आरोप केले आहेत. या आरोपांचे खंडन सोमय्या यांनी केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07311 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top