
परशुराम घाटाबाबत आराखडा सादर करा!
मुंबई, ता. ४ : ऐन पावसाळ्यात परशुराम घाटात कोसळणारी दरड आणि रस्ता खचण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परशुराम घाटाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत कालबद्ध आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम मागील दहा वर्षांपासून संथगतीने सुरू असून रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी मूळचे कोकणातील रहिवासी अॅड. ओवीस पेचकर यांनी न्यायालयात जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्या. अनिल मेनन आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याबाबत सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. जर तुम्ही खबरदारी घेत आहात, तर दरड का कोसळते, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपासून सुरू आहे, तरीही दरड कोसळणे, माती वाहून जाणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यासाठी तज्ज्ञांकडून ठोस उपाययोजना होताना का दिसत नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07322 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..