झाडे कोसळण्याच्या सर्वाधिक तक्रारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडे कोसळण्याच्या सर्वाधिक तक्रारी
झाडे कोसळण्याच्या सर्वाधिक तक्रारी

झाडे कोसळण्याच्या सर्वाधिक तक्रारी

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः पावसाळ्यातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला आहे. आपत्कालीन विभागातील मदत कक्षात गेल्या महिन्याभरात केवळ ४५ नागरिकांनी संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवल्या. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने त्यासंबंधी तक्रारीही कमी झाल्या. सर्वाधिक तक्रारी झाडे कोसळण्याबाबत आल्या.
पालिकेच्या आपत्कालीन मदत कक्षात १ जून ते ५ जुलैदरम्यान वेगवेगळ्या मदतींसाठी ४५ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील सर्वाधिक तक्रारी २५ या झाड आणि फांद्या कोसळण्याबाबत होत्या. त्याखालोखाल शॉक सर्किट १२ व घरे पडण्याबाबतच्या ८ तक्रारी आल्या.
पावसाळ्यात काही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास अथवा काही माहिती द्यायची असल्यास पालिकेच्या आपत्कालीन मदत कक्षातील १९१६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावर सर्वांत अधिक कॉल १८ पश्चिम उपनगर येथून करण्यात आले असून त्या खालोखाल पूर्व उपनगर १४, शहर १३ कॉल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07340 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top