ऊसतोड कामगारांच्या मुलांची वसतिगृहे सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसतोड कामगारांच्या मुलांची वसतिगृहे सुरू करा
ऊसतोड कामगारांच्या मुलांची वसतिगृहे सुरू करा

ऊसतोड कामगारांच्या मुलांची वसतिगृहे सुरू करा

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत २०२१ मध्ये संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात आली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेली २० वसतिगृहे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात जून २०२१ मध्ये शासन निर्णय जारी करून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २० वसतिगृहांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच भाड्याच्या जागेत हे वसतिगृहे उभारण्यासाठी आवश्यक निधीही देण्यात आला होता. त्यानुसार इमारत अधिग्रहण व अन्य प्रक्रियाही समाज कल्याण विभागाने पूर्ण केली असल्याने ही वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी मुंडे यांनी पत्राद्वारे केली. ऊसतोडणी हंगाम संपल्याने सध्या ऊसतोड कामगार हे आपल्या गावीच असतात, मात्र मुला-मुलींच्या शाळेसाठी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवणे हे त्या कामगारांना परवडणारे नसते. यावर शिक्षण व त्याला पूरक सुविधा पुरवणे हाच दीर्घकालीन उपाय असून या उद्देशानेच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली होती, त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १०० ची क्षमता असलेले १२, तर अहमदनगर व जालना जिल्ह्यात प्रत्येकी ४ असे एकूण २० वसतिगृह मंजूर करण्यात आले आहेत. ती सुरू करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07354 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..