दिग्गज खेळाडूंच्या इमारतीचा पुनर्विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्गज खेळाडूंच्या इमारतीचा पुनर्विकास
दिग्गज खेळाडूंच्या इमारतीचा पुनर्विकास

दिग्गज खेळाडूंच्या इमारतीचा पुनर्विकास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : वरळी़-वांद्रे समुद्री सेतूच्या उजवीकडे स्पोर्ट्सफील्ड ही इमारत असून येथे लिटिल मास्टर सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि इतर अनेक नामवंत क्रिकेट जगतातील माजी खेळाडू वास्तव्यास आहेत. मात्र, आता ही इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी विकसकांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

वरळी सी फेस परिसरात स्पोर्ट्सफील्ड ही नऊ मजली ३५ वर्षे जुनी इमारत आहे; परंतु इमारती जीर्ण झाल्याने पाणी गळती होऊ लागली आहे. या इमारतीमध्ये सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि इतर अनेक ख्यातनाम खेळाडू राहतात. स्पोर्ट्स फील्ड को-ऑप. हाऊसिंग सोसायटीमध्ये १८ निवासी सदनिका आणि एक व्यावसायिक गाळा आहे. या इमारतीचा भूखंड १७१६.८५ चौरस मीटर आहे. इमारत जीर्ण झाल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे विकसकांना ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत निविदा सादर करता येणार आहे. पुनर्विकासात रहिवाशांना अधिक मोठे घर आणि दोन पार्किंग मिळावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे.

इमारतीत राहणारे क्रिकेटपट्टू -
तळमजला - व्यावसायिक परिसर

पहिला मजला
- एमएम सोमय्या, हॉकी खेळाडू
- एकनाथ सोलकर कुटुंब - यशस्वी क्षेत्ररक्षक

दुसरा मजला
- रमाकांत देसाई यांचे कुटुंब - वेगवान गोलंदाज
- प्रदीप गंधे - बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष

तिसरा मजला
- विल्सन जोन्स कुटुंब - बिलियर्ड्स खेळाडू
- उमेश कुलकर्णी - माजी गोलंदाज

चौथा मजला
- रवी शास्त्री - माजी क्रिकेट कर्णधार
- यजुर्विंद्र सिंग - माजी क्रिकेटपटू

पाचवा मजला
- शरद दिवाडकर - माजी क्रिकेटपटू
- दिलीप वेंगसरकर - माजी क्रिकेटपटू

सहावा मजला
- पॉली उमरगर कुटुंब - माजी क्रिकेटपटू
- आर. जी. नाडकर्णी - माजी क्रिकेटपटू

सातवा मजला
- जी. एस. रामचंद - माजी क्रिकेटपटू
- अशोक मंकड - माजी क्रिकेटपटू

आठवा मजला
- सुनील गावसकर - माजी क्रिकेटपटू

नववा मजला
- अजित वाडेकर -माजी क्रिकेटपटू

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07360 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top