डबेवाले ११ जुलैला रजेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डबेवाले ११ जुलैला रजेवर
डबेवाले ११ जुलैला रजेवर

डबेवाले ११ जुलैला रजेवर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची... असे म्हणत संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत. या वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेण्याची ओढ डबेवाल्यांनाही लागली आहे. त्यामुळे डबेवाल्यांनी सोमवारी (११ जुलै) एक दिवसाची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी मुंबईत डब्बेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.
शनिवारी ९ जुलै रोजी दिवसभर डबेवाले आपले काम पूर्ण केल्यावर रात्री पंढरपूरला रवाना होणार आहेत. त्यानंतर रविवार एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेतील; तर दुसऱ्या दिवशी सोमवारी द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडून मुंबईला रवाना होणार आहेत. मंगळवार, १२ तारखेपासून डबेवाले पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
गेली दोन वर्ष पंढरपूरवारी कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन दोन वर्षे डबेवाल्यांना घेता आले नाही. पण या वर्षी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे वारीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दोन वर्षांनी का होईना, पण पांडुरंगाचे दर्शन होणार आहे याचा आनंद डबेवाल्यांना आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल माफी दिल्याने डबेवाल्यांनी समाधान व्यक्त केले असून त्याबद्दल त्यांचे आभार ही व्यक्त केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07368 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..