नवलखा यांच्या फोन सुविधेबाबत न्यायालयाची राज्याकडे विचारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवलखा यांच्या फोन सुविधेबाबत न्यायालयाची राज्याकडे विचारणा
नवलखा यांच्या फोन सुविधेबाबत न्यायालयाची राज्याकडे विचारणा

नवलखा यांच्या फोन सुविधेबाबत न्यायालयाची राज्याकडे विचारणा

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना कारागृहातून नातेवाईकांना फोनवरून संवाद साधण्याची परवानगी देणार का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. कारागृहात असलेल्या बंद्यांना नातेवाईक आणि वकिलांबरोबर बोलण्यासाठी फोनची आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध आहे. मात्र नवलखा यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे, अशी तक्रार नवलखा यांनी याचिकेद्वारे केली आहे.

देशातील सर्व राज्यांच्या कारागृहात आरोपींना नातेवाईक आणि वकिलांसोबत बोलण्यासाठी फोन करण्याची परवानगी देण्यात येते. केवळ तळोजा कारागृहात अशी परवानगी नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिल्लीतून मुंबईमध्ये यावे लागते, असेही त्यांनी नमूद केले आहे. याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कारागृहात असलेल्या बंदींना नातेवाईकांबरोबर फोनवर बोलण्याची परवानगी आहे. मात्र नवलखा यांना परवानगी आहे का, याची माहिती घ्यावी लागेल, असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. याबाबत १२ जुलै रोजी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. बंदींना व्हिडीओ कॉलची परवानगी देण्यासंदर्भात अन्य एक जनहित याचिका प्रलंबित आहे. कोरोना संसर्गावेळी अशी मुभा देण्यात आली होती, असे नवलखा यांच्या वतीने अॅड. युग चौधरी यांनी खंडपीठाला सांगितले. एल्गार परिषद आरोपींचा माओवादी संघटनांशी संबंध आहे, असा आरोप एनआयएने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07400 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..