
नव्या मंत्रिमंडळानंतरच एसटी बँक निवडणूकीची शक्यता
मुंबई, ता. ८ : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५० टक्के कर्मचारी थकबाकीदार झाले आहे. त्यामुळे कामगार कायद्यांतर्गत थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार असणार नाही. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्राधिकरणाने तत्कालीन सहकार मंत्र्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन मागितले होते. शिवाय थकबाकी वसूल होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची शिफारसही करण्यात आली होती. मात्र गेल्या सरकारमध्ये यासंदर्भात कोणताही निर्णय न होऊ शकल्याने आता नवीन मंत्रिमंडळानंतरच एसटी बँकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
एसटी बँकेच्या ५० शाखा मिळून सुमारे ८० हजारपेक्षा जास्त सभासद आहे. त्यापैकी सध्या फक्त २५ ते ३० हजार सभासद मतदानास पात्र आहेत. त्यामुळे सर्वाधिक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती एसटी बँकेने निवडणुक प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिली. यासंदर्भात निवडणूक प्राधिकरणाला एसटी बँक प्रशासनाने परिस्थितीचा अहवाल सुद्धा पाठवला आहे. एसटी महामंडळातील सुमारे २२ एसटी कर्मचारी संघटना बँकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहे. त्यासोबतच थकबाकीदार एसटी कर्मचाऱ्यांना सूट देण्याची शक्यता असल्याने, सर्वाधिक मतदारांची संख्या निर्माण झाल्यानंतरच एसटी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याचे बँक व्यवस्थापकाने व्यक्त केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07406 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..