
लवकरच रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गेल्या सरकारमध्ये रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा रखडलेला प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी रिक्षा, टॅक्सी संघटनांशी चर्चा सुरू असून, खटूवा समितीच्या भाडेवाढीच्या शिफारशी नुसार ही भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षा २ तर टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढणार असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.
इंधनाच्या दरात कपात झाली मात्र, सीएनजीच्या दराने उच्चांक घेतला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात आहे. त्यामुळे खटुवा समितीच्या भाडेवाढीच्या शिफारशीनुसार टॅक्सी ३ तर रिक्षा २ रुपये वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सातत्याने इंधनासह सीएनजीचे दर वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल १११.३५ तर डिझेल ९७.२८ रुपये प्रति लिटर दर होते तर ७६ रुपये किलो सीएनजी चे दर आहेत.
त्यामुळे, खटुवा समितीच्या भाडेवाढीच्या सूत्रानुसार रिक्षाचे भाडे २१ ऐवजी २३ रुपयांपर्यंत वाढू शकते तर टॅक्सीचे भाडे २५ ऐवजी २८ होण्याची शक्यता आहे. सध्या खटुवा समितीचे सूत्र समजून त्यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे.
--------
खटुवा समितीच्या शिफारसीनुसार रिक्षाचे भाडे २ रुपयाने वाढणे आवश्यक आहे. इंधन,सीएनजीच्या वाढत्या दरामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. येत्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
- थॅम्पी कुरियन, सरचिटणीस, मुंबई रिक्षा मेन्स युनियन
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07408 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..