मुंबईत तुरळक सरी, रेड अलर्ट फोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत तुरळक सरी, रेड अलर्ट फोल
मुंबईत तुरळक सरी, रेड अलर्ट फोल

मुंबईत तुरळक सरी, रेड अलर्ट फोल

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबईत दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून सध्या तुरळक सरी कोसळत आहेत. शहरात केवळ ४.७ मि.मी. पाऊस झाला असून सांताक्रूझ येथे २.२ मि.मी.; तर कुलाबा येथे १.२ मि.मी. पाऊस कोसळला आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टचा अंदाज पुन्हा एकदा फोल ठरला आहे.

मुंबईत शुक्रवारीच पावसाचा जोर कमी झाला असून शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील पावसाची उघडझाप सुरू होती. शनिवारी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. त्यामुळे संपूर्ण दिवस हवेत गारवा राहिला.

वेधशाळेचा अंदाज ः
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी शहरात सात ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत; तर शॉर्टसर्किटच्या दोन घटना समोर आल्या. तसेच झाडे, फांद्या पडण्याच्या नऊ घटना घडल्या असून त्यात कुणीही जखमी किंवा मृत झालेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07426 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top