औषधांचे दरपत्रक रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधांचे दरपत्रक रखडले
औषधांचे दरपत्रक रखडले

औषधांचे दरपत्रक रखडले

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : महापालिका रुग्णालयांमध्ये गरजेच्या औषधांचेच दरपत्रक अद्याप तयार न झाल्याने पावसाळी आजारांसाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी रखडली आहे. त्यामुळे वेळेवर औषधे उपलब्ध न झाल्यास पालिका रुग्णालयातील रुग्णांची फरपट होणार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून भाजपने औषधांचे दरपत्रक तात्काळ तयार करण्याची मागणी केली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने निर्धारित केलेल्या औषध अनुसूची क्रमांक १ (वर्ष २०२१ ते २०२३) मधील यादीमध्ये ४७ प्रकारच्या औषधांचा समावेश आहे. यातील बहुतांश औषधे पावसाळ्यातील आजारांशी संबंधित आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधी औषध खरेदी केली जाते; मात्र त्यापूर्वी औषधांचे दरपत्रक तयार करून ही खरेदी होते. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, तरीही अद्याप औषधांचे दरपत्रक तयार झालेले नाही. त्यामुळे औषधखरेदी रखडल्याचा आरोप भाजपचे माजी गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केला.
---
अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीनंतर मार्च महिन्यापासून औषधांच्या निविदेची प्रक्रिया सुरू आहे; मात्र ती पूर्ण होऊ शकलेली नाही. औषधांचे दरपत्रक लवकरात लवकर काढावे, तसेच त्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- प्रभाकर शिंदे, माजी गटनेता, भाजप.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07448 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..