मुंबईत कोरोनाचे २३५ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे २३५ नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे २३५ नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे २३५ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मुंबईत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत १०० ने घट होत आहे. मुंबईत शनिवारी (ता. ९) कोरोनाच्या ४९९ रुग्णांची नोंद झाली होती; तर रविवारी ही रुग्णसंख्या १०० ने घसरून ३९९ इतकी नोंदवली गेली. सोमवारी याच रुग्णसंख्येत १६४ ने घट झाली असून, दिवसभरात २३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यानुसार मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाख १९ हजार ३० वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९,६२४ स्थिरावली आहे. रविवारी ४३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९५ हजार ८४९ रुग्ण कोरोनातून बरे झाले. मुंबईत सद्यस्थितीत ३,५५७ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07456 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top