आरोपांतून कायदेशीर तरतुदींची पूर्तता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपांतून कायदेशीर तरतुदींची पूर्तता!
आरोपांतून कायदेशीर तरतुदींची पूर्तता!

आरोपांतून कायदेशीर तरतुदींची पूर्तता!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : खंडणीवसुलीच्या आरोपात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेले आरोपपत्र कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणारे आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने सोमवारी देशमुख यांच्यासह तिघांचा जामीनअर्ज फेटाळला. या निकालाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये न्यायालय फार सविस्तरपणे तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आरोपपत्रासह निर्धारित कालावधीत कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक नाही, असा दाखला न्यायालयाने निकालात दिला आहे.
सीबीआयने अटकेपासून ६० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही आणि जे आरोपपत्र दाखल केले, ते अपूर्ण आहे, असा आरोप करणारी जामीन याचिका देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांनी केली होती. न्यायालयाने तिघांना जामीन नाकारला आहे. देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे या खटल्यात माफीचा साक्षीदार आहे. आरोपपत्रात साक्षीदारांचे जबाब आणि अन्य कागदपत्रे दाखल केली नाहीत म्हणून ते आरोपपत्र अपूर्ण ठरत नाही, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. गौलानी यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालय एवढ्या तांत्रिक बाबींवर जामीन सुनावणीमध्ये भाष्य करत नाही; मात्र सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र हे कायदेशीर बाबींची पूर्तता करणारे आहे. तसेच यामध्ये निर्धारित वेळेत पोलिस अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे आरोपी जामीन मिळण्यासाठी पात्र ठरत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07471 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..