महापालिका शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक
महापालिका शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक

महापालिका शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर पर्यायी व्यवस्था म्हणून डी. एड., बी. एड. झालेल्या शिक्षक उमेदवारांना तासिका तत्त्वावर अध्यापनाचे काम दिले जाणार आहे. यासाठीचा अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर त्याची मंगळवारपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
पर्यायी शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांना मुंबई महापालिकेच्या शाळांतील मुख्याध्यापकांकडे अर्ज करावा लागणार आहे, त्यांना प्रतितास १५० रुपये (दररोज कमाल सहा तास) मानधन दिले जाणार आहे; मात्र यासाठी सेवा घेण्याचे अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये यंदा पटसंख्या विक्रमी संख्येने वाढली आहे; मात्र दुसरीकडे शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. यासाठी शाळेच्या आवश्यकतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास डी. एड. डी. टी. एड. व बी. एड. या व्यावसायिक अर्हतेच्या गुणांच्या आधाराने प्राधान्यक्रम ठरवून निवड करण्यात येणार आहे.
...
दीर्घ मुदत रजेवरील...
दीर्घ मुदत रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागेवर इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गासाठी ११ ते १२० दिवसांसाठी ही पर्यायी शिक्षकांची सेवा घेण्यात येणार आहे; मात्र यासाठी संबंधित विभागाचे उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक (शाळा), प्रशासकीय अधिकारी (शाळा), निरीक्षक (शाळा) यांच्यामार्फत रिक्त पदांची खात्री केल्यानंतर पर्यायी शिक्षकांच्या सेवा घेता येतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07491 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..