
आयटीआय प्रवेशही सीबीएसईच्या निकालानंतर
मुंबई, ता. १३ : अकरावी ऑनलाईनपाठोपाठ आता राज्यातील आयटीआयमधील प्रवेश हे सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या निकालानंतरच केले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
राज्यातील सरकारी, खासगी आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर गेल्या काही वर्षांत केंद्रीय मंडळाच्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता, याबाबतची माहिती घेऊन संचालनालयाने ही प्रवेश प्रक्रिया सीबीएसई, आयसीएसईच्या निकालानंतरच घेण्याचा निर्णय घेण्यात आहे. प्रत्येक वर्षी केंद्रीय मंडळातील सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीत अर्ज करतात. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यास त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संचालनालयाकडून केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या निकालापर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया थांबवल्याचे सांगण्यात आले.
--
प्रवेशासाठी विक्रमी अर्ज
आयटीआयच्या राज्यात ४१९ शासकीय आयटीआय असून यामध्ये यंदा ९३ हजार ९०४, तर ५७२ खासगी संस्थांमध्ये ५५ हजार ३६४ अशा एकूण एक लाख ४९ हजार २६८ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत तब्बल एक लाख ७९ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपले अर्ज पूर्ण भरले आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी कटऑफ वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
--
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07492 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..