
मुंबईकरांचा बेस्टच्या ई-तिकीटिंगला पसंती
मुंबई, ता. १३ : प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी ‘बेस्ट’ने ऑनलाईन माध्यमांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने ई-तिकीट प्रणाली सुरू केली. बेस्टच्या या प्रयत्नाला प्रवाशांची पसंती मिळत असून गेल्या पाच महिन्यात ६० टक्के म्हणजे १८ लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे, तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी ‘बेस्ट’ने डिजिटल प्रणाली वापरण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत बेस्टने सादर केलेली ‘चलो’ स्मार्टकार्ड सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टच्या एकूण प्रवाशांपैकी सुमारे १२ टक्के प्रवासी ‘चलो’ ॲपचा वापर करत आहेत. ई-तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांना घरबसल्या सेवा मिळत आहे, त्याशिवाय सदर स्मार्टकार्ड ऑनलाईन पद्धतीने रिचार्जही करता येतो. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमधील सुट्ट्या पैशांचा वादही कमी झाला, तसेच प्रवाशांच्या रांगाही दिसत नाही. अशाप्रकारे डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.
.....
बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी डिजिटल सिस्टमवर भर दिला आहे. बेस्टसह प्रवाशांनाही त्याचा फायदा होत असून या सेवांचा अधिक विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07493 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..