अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार
अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालय संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईसह राज्यातील पाच पालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश सुरू करण्यासाठी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालय संस्थाचालक संघटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुंबईतील विद्यार्थी संघटनाही हे प्रवेश सुरू व्हावेत यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

केद्रीय मंडळाच्या सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊ शकला नसल्याने अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पुढील प्रवेशाचा टप्पा थांबवण्यात आला आहे. यंदा मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नोंदणीत १७७ हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांची नव्याने भर पडली असून ४५ हजारांच्या दरम्यान जागाही वाढल्या आहेत. या जागा वाढल्याने अनेक खासगी, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय संघटना आता या प्रवेशासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच भेटून आपली मागणी मांडणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07505 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top