रियाकडून ड्रग्ज खरेदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रियाकडून ड्रग्ज खरेदी!
रियाकडून ड्रग्ज खरेदी!

रियाकडून ड्रग्ज खरेदी!

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आरोपी असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक बॉलीवूडमधील लोकांसह उच्चभ्रू सोसायटीत अमली पदार्थांचा पुरवठा करायचे, तसेच सुशांतसाठी तीच ड्रग्ज खरेदी करायची, असा गंभीर आरोप एनसीबीने आरोपपत्रात लावला आहे.
सुशांतला ड्रग्ज पुरवणे, ते खरेदी करणे, त्याची ने-आण करणे, नशेला प्रोत्साहन देणे, यासाठी रियाने काम केले. त्यासाठी भाऊ शौविकसह वेगवेगळ्या ड्रग्ज विक्रेत्यांकडून रियाने गांजा खरेदी केल्याचा आरोपही एनसीबीने लावला आहे. एनसीबीने आपल्या आरोपपत्रात ३५ आरोपींविरोधातील मसुदा दाखल केला आहे. आरोपी सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आदींकडून तिने अनेकदा गांजा खरेदी केला होता आणि तो सुशांतला दिला, असाही आरोप एनसीबीने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07513 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top