स्मारकासाठीच्या सर्व परवानगीची पूर्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मारकासाठीच्या सर्व परवानगीची पूर्तता
स्मारकासाठीच्या सर्व परवानगीची पूर्तता

स्मारकासाठीच्या सर्व परवानगीची पूर्तता

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत, असा दावा आज मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या परिसरात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने एमआरटीपी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती केली आहे, परंतु हा निर्णय घेताना नियमांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयानी यांनी केली आहे.

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी (ता. १३) यावर महापालिकेच्या वतीने ॲड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली. राज्य सरकारने २०१८ मध्ये महापौर निवासाचे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यास मंजुरी दिली. बंगल्याच्या जागेचे आरक्षण नियमानुसार बदलले. त्यासाठी आरक्षणातील बदल महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्यातील (एमआरटीपी) तरतुदींनुसार करण्यात आला आहे, असा दावा पालिकेने प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच महापौरांचा बंगला हा हेरिटेज वर्गवारीच्या दुसऱ्या श्रेणीत आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी हेरिटेजच्या दृष्टीने सर्व आवश्यक नाहरकती देण्यात आल्याचा दावा मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर याचिकेत केलेले आरोप आधारहीन आहेत, असे पालिका आणि हेरिटेज समितीने प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07524 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top