कुर्ला इमारत दुर्घटनेतील महिलेचा जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ला इमारत दुर्घटनेतील महिलेचा जामीन फेटाळला
कुर्ला इमारत दुर्घटनेतील महिलेचा जामीन फेटाळला

कुर्ला इमारत दुर्घटनेतील महिलेचा जामीन फेटाळला

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : कुर्ला येथील इमारत दुर्घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सदनिकाधारक महिलेचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने बुधवारी नामंजूर केला. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारत धोकादायक आहे हे माहीत असूनही तिथे कामगारांना राहायला दिले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. २६ जून २०२२ ला ही चार मजली इमारत कोसळली होती. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. नेहरू नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रंजनी राठोड यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. राठोड यांनी स्वतः जागा खाली केली; मात्र ती एका कंत्राटदाराला भाड्याने दिली होती. ज्यामध्ये त्यांनी कामगारांना राहण्यास सांगितले होते. न्यायालयाने याची नोंद घेतली असून जामीन फेटाळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07533 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top