आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवलेंची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवलेंची निवड
आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवलेंची निवड

आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवलेंची निवड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. शिवाय राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड ३ वर्षांसाठी असून, राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण २६ लोकांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून रिपब्लिकन कार्यकर्ते मंत्रिपदी निवड करण्याची मागणी करीत आहेत. अनेकांनी इच्छा व्यक्त करत निवेदन दिले आहे. त्यांच्यापैकी एका कार्यकर्त्याला राज्यात मला निश्चित मंत्रिपद मिळवून द्यावे लागेल. त्याबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे आठवले म्हणाले. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात काही प्रमाणात कपात केली आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मेट्रो कारशेड हे आरे येथे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आमचा पाठिंबा आहे, असेही आठवले म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07549 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..