अल्पवयीन आरोपीला जामीन अर्ज करण्याचा अधिकार : मुंबई हायकोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Court
अल्पवयीन आरोपीला जामीन अर्ज करण्याचा अधिकार

अल्पवयीन आरोपीला जामीन अर्ज करण्याचा अधिकार : मुंबई हायकोर्ट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : बालन्यायालयात खटला सुरू असलेल्या बाल आरोपी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतात, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अनेक अल्पवयीन आरोपींना दिलासा मिळू शकतो.
आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला अन्य सर्वसामान्य आरोपींप्रमाणे समान अधिकार असतात. फौजदारी दंडसंहितेत कलम ४३८ नुसार अल्पवयीन आरोपीला जामिनाचा हक्क नामंजूर करणे म्हणजे राज्य घटनेत तरतुदीच्या विरोधात आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणात न्या. एस. व्ही. कोतवाल आणि न्या. बी. पी. देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे. १४ आणि १६ वर्षांच्या परभणीमधील दोन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र ज्युवेनाईल जस्टीस कायद्यात याबाबत पूर्ण स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे न्या. विभा कनकवाडी यांनी हा मुद्दा विशेष खंडपीठाकडे वर्ग केला होता. यावर न्यायालयाने नुकताच निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07568 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..