आदिवासी महिलांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी महिलांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले
आदिवासी महिलांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले

आदिवासी महिलांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : आरे जंगलात कारशेड उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याविरोधात सेव्ह आरेकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. मात्र या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपल्या लहानमुलांसोबत आलेल्या आदिवासी महिलांना पोलिसांनी आरे आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले. यामुळे पोलिस आणि आंदोलक यांच्यात काहीशी बाचाबाची झाली. या गोंधळामुळे घाबरून लहान मुलांनी आक्रोश सुरू केला. महिला आणि लहान मुलांशी तरी पोलिसांनी समांजस्याने वागावे असे सेव्ह आरे ग्रुपकडून सांगण्यात आले.

फडणवीस सरकार जागे व्हा, आरे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, लवकर कारशेडचा निर्णय घ्या अशा घोषणा देत सेव्ह आरेकडून विविध पोस्टर दाखवत रविवार आंदोलन करण्यात आले. आरेमधील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी तीन वर्षानंतरही झालेली नाही. त्यामुळे सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सेव्ह आरेकडून करण्यात आली.

कांजूर राज्य सरकारची जागा असूनही लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि आरेत कारशेड उभारण्याचा अट्टाहास धरणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सरकारने कितीही अट्टाहास केला तरी आम्ही आरेत मेट्रो कारशेड उभे करून देणार नाही. संयमाने सुरू असलेले हे आंदोलन होऊ न देण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. या दबावामुळे पोलिसांकडून आंदोलकांची अडवणूक केली जाते, असे सेव्ह आरेचे निशांत बंगेरा यांनी सांगितले.

विद्या चव्हाण यांनी पोलिसांना सुनावले
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या देखील आरे जंगल वाचवा मोहिमेसाठी मैदानात उतरल्याचे रविवारी पाहायला मिळाले. विद्या चव्हाण यांनी प्रकल्पाला विरोध करत प्रकल्प लवकरात लवकर आरेच्या बाहेर स्थलांतर करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्या चव्हाण यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. चव्हाण म्हणाल्या की, पर्यावरण प्रेमींनी आंदोलन किती वेळ करायचे, हे ठरवणारे तुम्ही कोण, असा सवाल उपस्थित करून आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे चव्हाण यांनी पोलिसांना सुनावले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07591 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..