राज्यात मॅक्सी कॅबला एसटी कर्मचारी संघटनांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taxi
राज्यात मॅक्सी कॅबला विरोध

राज्यात मॅक्सी कॅबला एसटी कर्मचारी संघटनांचा विरोध

मुंबई, ता. १८ : राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पा प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त एसटी महामंडळाला आहेत. त्यामुळे सरकार इतर कुणालाही टप्पा प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार देऊ शकत नाही. राज्यात ज्यांना टप्पे वाहतुकीची परवानगी नाही, तेही टप्पा वाहतूक करीत आहेत. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाल्याने मॅक्सी कॅब धोरणाला तीव्र विरोध करण्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.

राज्यात लाखोंच्या संख्येने अवैध वाहतूक सुरू आहे. असे असताना रोजगार व सरकारला उत्पन्न मिळेल, या नावाखाली मॅक्सी कॅबसारख्या वाहनांना परवानगी देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. परिवहन विभागाकडून त्यासाठी पुढाकार घेऊन सोमवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एसटी कर्मचारी संघटनांनी मॅक्सी कॅब धोरणाला तीव्र विरोध केला आहे.
खेड्यापाड्यात, दुर्गम व डोंगराळ भागात नुकसानाची पर्वा न करता एस. टी. महामंडळ आजही सेवा देत आहे. खासगी वाहतूकदार मात्र चांगल्या रस्त्यावरूनच वाहने चालवितत. खासगी वाहतूकदार हे त्याचे भाडेदेखील मनाप्रमाणे आकारतात. त्यातून गोरगरीब प्रवाशांची लुबाडणूक होत आहे. त्यामुळे मॅक्सी कॅबसारख्या वाहनांना सरकारने परवानगी देऊ नये. सरकारने हा निर्णय घेतल्यास त्याविरोधात तीव्र लढा देण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

उत्पन्नात ६ कोटींची तूट
एस. टी. महामंडळाचे दोन वर्षांपूर्वीचे दिवसाचे उत्पन्न दिवसाला २२ कोटी रुपये होते व प्रवासी संख्या ५८ लाख होती. आता दर दिवसाला फक्त १६ कोटी इतके उत्पन्न मिळत असून, प्रवासी संख्या २५ लाख इतकी झाली आहे. महामंडळाचे उत्पन्न कमी होण्याला निव्वळ खासगी अवैध वाहतूक जबाबदार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07600 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :taxitransport department