
मुंबईत हलक्या सरी
मुंबई, ता. १८ : पावसाचा जोर मंदावला असला, तरी सोमवारी काही भागात हलक्या सरी बरसल्या. मुसळधार पाऊल नसला, तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नऊ झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या; मात्र त्यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत आज दिवसभरात केवळ ६.९४ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळपर्यंत कुलाबा येथे ०.६ मिमी; तर सांताक्रूझ येथे ४.९ मिमी पाऊस झाला. शहरात ६.१८ मिमी, पूर्व उपनगरात ८.५९ मिमी, तर पश्चिम उपनगरात ६.०५ मिमी पावसाची नोंद झाली.
---
ढगाळ वातावरणाचा अंदाज
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत एका ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, दिवसभर शहरातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07609 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..