पक्षीप्रेमी प्रदीप डिसूझा यांना जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षीप्रेमी प्रदीप डिसूझा यांना जामीन मंजूर
पक्षीप्रेमी प्रदीप डिसूझा यांना जामीन मंजूर

पक्षीप्रेमी प्रदीप डिसूझा यांना जामीन मंजूर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : पक्ष्यांची शिकार आणि बेकायदा खरेदी-विक्री केल्याच्या आरोपात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्दबातल करण्यासाठी पक्षीप्रेमी प्रदीप डिसूझा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. यावर त्यांना दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. डिसूझा पक्ष्यांची काळजी घेत होते आणि वन विभागाने त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मी कोणत्याही पक्षाला इजा केली नाही, मानवीय हेतूने त्यांना सांभाळले, असे याचिकेत म्हटले आहे. न्या नितीन जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर २ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.
दोन वर्षांपूर्वी मार्चमध्ये डिसूझा यांनी काही जखमी पक्ष्यांची सुटका कायदेशीर मार्गाने केली होती. या पक्ष्यांच्या पुनर्वसनासाठी त्याचा सर्व तपशील त्यांनी वनविभागाला लेखी कळवला होता आणि पक्ष्यांना निवारा देण्यासाठी सुचवले होते; मात्र याची दखल न घेतल्यामुळे या पक्ष्यांना त्यांना स्वत:कडे ठेवावे लागले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या घरावर वन्यजीव गुन्हे विभागाकडून छापा टाकण्यात आला. त्या वेळी ११० पतंग, ४३ पोपट, आठ वटवाघुळ, सात घुबड, सीगल पक्षी ताब्यात घेण्यात आले. हे सर्व पक्षी त्या वेळी जखमी अवस्थेत होते आणि उडण्याच्या स्थितीत नव्हते; मात्र पोलिसांनी त्यांच्याविरोधात शिकार, वाहतुकीचा आरोप केला आहे. हा गुन्हा रद्दबातल करण्याची मागणी डिसूझा यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07628 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..