एसटीला नादुरुस्त बसगाड्याचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीला नादुरुस्त बसगाड्याचे ग्रहण
एसटीला नादुरुस्त बसगाड्याचे ग्रहण

एसटीला नादुरुस्त बसगाड्याचे ग्रहण

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः इंदूर-अमळनेर मार्गावर नर्मदा नदीत एसटी बस कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एसटी बसगाड्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या काही वर्षांपासून एसटीकडून नव्या बसगाड्यांची खरेदी न झाल्याने जुन्या आणि नादुरुस्त वाहनांवर कारभार हाकावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या एसटीच्या ताफ्यातील निम्म्यांहून अधिक बसगाड्यांचे वयोमान आठ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे; तर नादुरुस्त बसगाड्यांची संख्या तीन हजाराच्या आसपास आहे.
मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीत कोसळलेल्या एसटी बसचे फिटनेस योग्य असल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाने दिले होते; मात्र ही बस १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, कुणाची चूक होती, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही; मात्र या अपघाताच्या निमित्ताने एसटीतील जुन्या आणि नादुरुस्त बसगाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या एकूण १६९६९ बसगाड्या असून त्यापैकी १,१०० बसगाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या १५,८६९ बसगाड्यांपैकी सध्या केवळ १३ हजार बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित २८६९ बसगाड्या नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
......
गेल्या काही वर्षांत कोरोना आणि संपामुळे नव्या बसगाड्यांची खरेदी करता आली नाही. सध्या टाटा कंपनीला ७०० साध्या बसगाड्यांचे कंत्राट दिले आहे. त्याशिवाय दोन हजार इलेक्ट्रिक; तर दोन हजार सीएनजी अशा एकूण ४७०० नव्या बसगाड्या एसटीच्या ताफ्यात येणार आहेत.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
--------

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07634 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..