
मुंबईचा डबेवाला शिवसेनेसोबत!
मुंबई, ता. १९ : शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे एकनाथ शिंदे गटात गेले आहे. मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील मूळ रहिवासी असलेले मुंबईतील डबेवाले आणि त्यांचे कुटुंबीय मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. सध्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे. त्यामुळे डबेवाले कामगार दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. संघटनेतील सर्व कामगार हे मराठी आहेत. मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.
......
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07636 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..