फ्रजाईल एक्स आजाराच्या जागृतीसाठी निळी रोषणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्रजाईल एक्स आजाराच्या जागृतीसाठी निळी रोषणाई
फ्रजाईल एक्स आजाराच्या जागृतीसाठी निळी रोषणाई

फ्रजाईल एक्स आजाराच्या जागृतीसाठी निळी रोषणाई

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : फ्रजाईल एक्स या आजाराच्या जनजागृतेसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील ताज टॉवरसह आठ प्रमुख इमारतींना निळी रोषणाई करण्यात येणार आहे. फ्रजाईल एक्स हा अनुवांशिक आजार असून २२ जुलै हा दिन जागतिक फ्रजाईल जागरूकता दिन म्हणून जगभर पाळला जातो. त्यानिमित्ताने आजाराच्या स्थितीबद्दल शुक्रवारी ही रोषणाई करण्यात येणार आहे. देशभरातील ३१ महत्त्वाच्या इमारतींदेखील या दिवशी निळ्या रोषणाईत न्हाऊन निघतील, असे फ्रजाईल एक्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेकडून सांगण्यात आले.
हा आजार म्हणजे अनुवांशिक स्थिती असून यातून बौद्धिक अपंगत्व येते. हे सौम्य ते गंभीर बौद्धिक अपंगत्व असू शकते. महिला तसेच पुरुषांना हा आजार प्रभावित करत असून मात्र स्त्रियांमध्ये याची सामान्यतः सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. या वर्षी आयनॉक्स आणि पीव्हीआर या आघाडीच्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहांनी देखील पाठिंबा दिला असल्याचे फ्रजाईल एक्स सोसायटीकडून सांगण्यात आले. तसेच निवासी इमारती, शाळा, क्लब आणि इतर अनेक इमारतींकडून दरवर्षी पाठिंबा वाढत असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले. देशभरात सुमारे चार लक्ष जण फ्रजाईल एक्स सिंड्रोमने ग्रस्त आहेत. या मोहिमेतून हा आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लवकर निदान आणि उपचार मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07660 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top