हस्तलिखितांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हस्तलिखितांबाबत जागरुकता
निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत!
हस्तलिखितांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत!

हस्तलिखितांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत!

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्य सरकारने त्यांची मानसिकता बदलायला हवी. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य समाजसुधारकांचे हस्तलिखित राज्य सरकारने जतन करावे आणि याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
राज्य सरकारने आतापर्यंत अनेक समाज सुधारकांची हस्तलिखिते सुरेख पद्धतीने प्रकाशित केली आहेत, पण त्याची माहिती किती जणांना आहे. राज्य सरकारने ही माहिती नागरिकांपर्यंत पोचवायला हवी, असे निरीक्षण न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. किशोर संत यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. ही प्रकाशने अनेक वर्षांपूर्वी केलेली आहेत, पण दुर्दैवाने त्याबाबत कोणालाही माहिती नाही, अशी नाराजी खंडपीठाने व्यक्त केली.
---
न्यायालयाची स्युमोटो याचिका
राज्य सरकारने आंबेडकर, महात्मा फुले यांची हस्तलिखिते जतन करण्याचा उपक्रम थांबवल्याच्या वृत्तावरून न्यायालयाने स्युमोटो याचिका केली आहे. राज्य सरकारने याबाबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात समाधानकारक उत्तर न दिल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याबाबत समिती नियुक्ती, सदस्य आदींचा तपशीलदेखील स्पष्ट केला नाही. सरकारची ही भूमिका असमाधानकारक आहे असे खंडपीठ म्हणाले. याबाबत नियुक्त समितीने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07667 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..