दहशतवादातील आरोपींना पत्राचाच आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवादातील आरोपींना पत्राचाच आधार
दहशतवादातील आरोपींना पत्राचाच आधार

दहशतवादातील आरोपींना पत्राचाच आधार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : कारागृहातील ज्या आरोपींवर दहशतवादसंबंधित यूएपीए, मोक्का, राष्टद्रोह आणि नक्षलवादी कारवायाचे आरोप असतील, त्यांना नियमित दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याची परवानगी नाही, असे कारागृह प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले; मात्र त्याचवेळी आरोपी त्यांच्या नातेवाईकांना पत्र लिहू शकतात आणि कारागृहात प्रत्यक्ष भेटू शकतात, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी पत्रकार गौतम नवलखा (७०) यांनी त्यांना फोन करण्यासाठी मनाई केल्याच्या विरोधात न्यायालयात याचिका केली आहे. न्या. नितीन जामदार यांच्या समोर यावर नुकताच सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारकडून भूमिका मांडण्यात आली. कोरोना कालावधीत सर्व बंद्यांना व्हिडीओ कॉलवर बोलायला परवानगी देण्यात आली होती. दिल्लीमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नीबरोबर त्यांना बोलण्याचीही मुभा होती; मात्र आता ही मुभा बंद केली आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी २ ऑगस्टला निश्चित केली आहे. यासंदर्भात आणखी एक जनहित याचिका मुख्य न्यायाधीशांकडे दाखल आहे. यामध्ये बंद्यांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर फोनवरून बोलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07677 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top