निर्देशांक अर्धा टक्क्याने वधारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक अर्धा टक्क्याने वधारले
निर्देशांक अर्धा टक्क्याने वधारले

निर्देशांक अर्धा टक्क्याने वधारले

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ ः जागतिक शेअरबाजारांमध्ये गुरुवारी सावधगिरीची भूमिका दिसूनही भारतीय सेन्सेक्स व निफ्टी मात्र अर्धा टक्का वाढले. सेन्सेक्स २८४.४२ अंश तर निफ्टी ८४.४० अंश वाढला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५५,६८१.९५ अंशांवर तर निफ्टी १६,६०५.२५ अंशांवर बंद झाला.

युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरासंबंधीच्या बैठकीमुळे आज सर्वत्र गुंतवणुकदार सावध भूमिकेत दिसत होते. त्यामुळे दुपारपर्यंत भारतीय शेअरबाजारही नरमगरमच होते. पण दुपारनंतर चांगली खरेदी झाली व निर्देशांक वधारले. गुरुवारी बँकिंग व अर्थसंस्थांचे शेअर वाढले तर औषधनिर्मिती कंपन्यांच्या शेअरने तोटा केला. गेले काही दिवस परदेशी गुंतवणुकदार खरेदी करीत असल्यानेही भारतीय शेअरबाजारांत उत्साहाचे वातावरण होते. निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ४२ शेअर नफ्यात होते तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २६ नफ्यात होते. आज सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी डॉ. रेड्डीज लॅब, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज व एचडीएफसी बँक यांचे भाव कमी झाले. तर इंडसइंड बँक आठ टक्के वाढून ९४८ रुपयांवर गेला. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के वाढले. टेक महिंद्र, अॅक्सीस बँक, एलअँडटी, नेस्ले यांचेही भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव
सोने - ५०,१८० रु.
चांदी - ५५,६०० रु.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07678 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top