
शाळेतील टॅबलेट कॉम्प्युटरवर डल्ला?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या डी. एन. नगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेले टॅबलेट कॉम्प्युटर चोरीला गेले आहेत. शाळा दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारानेच हा डल्ला मारल्याचा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष किशोर राणे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
डी. एन. नगर पालिका शाळेची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने विद्यार्थ्यांचे टॅबलेट कॉम्प्युटर दुरुस्ती दरम्यान चोरी केले. या साहित्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून सदर प्रकरण दडपले, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी सुलभ व्हावे म्हणून पालिकेकडून हे टॅबलेट कॉम्प्युटर देण्यात आले होते. आता हे कॉम्प्युटरच गायब झाल्याने के पश्चिम अधिकाऱ्यांनी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात कंत्राटदारावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. याबाबत के. पश्चिम विभागाचे सहाय्य्क आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07682 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..