
अमलीपदार्थ बाळगल्याच्या आरोपातून पाच वर्षानंतर सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : अमलीपदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या सलीम शेखची तब्बल पाच वर्षांनंतर सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुरेशा सबळ पुराव्यांअभावी गुरुवारी सुटका करण्याचे आदेश दिले.
अमली पदार्थ खरेदी केल्याच्या आरोपात २०१७ मध्ये पोलिसांनी सलीम शेखला अटक केली होती. पोलिसांना त्याच्याजवळील एका पिवळ्या रंगाच्या पिशवीत १०० ग्रॅम एमडी आढळले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मागील पाच वर्षे कारागृहात होता; मात्र न्यायालयात गुन्ह्याची पुष्टी देणारे साक्षीदार अभियोग पक्ष दाखल करू शकला नाही. पोलिसांनी आणलेल्या साक्षीदारांच्या जबानीत अस्पष्टता आणि विसंगती होती. तसेच पंचनामा केलेली कागदपत्रे आणि पुरावे एनडीपीएस कायद्यानुसार नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला. अखेर न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. तसेच अमली पदार्थ जप्त करण्यापासून प्रत्येक बाब या प्रकरणात स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षणही नोंदवले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07694 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..