बीडीडी पुनर्वसन : क्षयरोगाचा धोका, आरेखनात बदल करा; CM ना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BDD Chawl Mumbai
‘बीडीडी’ प्रकल्पाच्या आरेखनात बदल करा

बीडीडी पुनर्वसन : क्षयरोगाचा धोका, आरेखनात बदल करा; CM ना पत्र

मुंबई - म्हाडामार्फत राबवण्यात येत असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नवीन इमारतींच्या आरेखनात बदल करण्याची मागणी नगर रचनाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत पुरेसा प्रकाश आणि वायुव्हिजन उपलब्ध होणार नसल्याने रहिवाशांना क्षयरोगासारखे आजार उद्‍भवू शकतात, अशी भीती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे, परंतु नगररचनाकारांचे आरोप हे केवळ प्रकल्पात अडथळा आणण्यासाठी असल्याचा आरोप बीडीडीतील संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे.

ना. म. जोशी मार्ग, वरळी, नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत रहिवाशांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे. सध्या वरळी येथे इमारत बांधण्याचे काम सुरू असून ना. म. जोशी मार्ग येथील इमारती खाली करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या आरेखनावर शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पात ४० मजल्याच्या ३२ इमारती उभारण्यात येणार असून तिथे पुरेसा प्रकाश राहणार नाही. अपुऱ्या वायुव्हिजनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

तसेच विक्री घटकाच्या इमारती ६५ मजली आणि त्यात अतिरिक्त १० मजले हे वाहनांच्या पार्किंगसाठी असणार आहेत. त्यामुळे या इमारतींपुढे बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या इमारती झाकल्या जाणार असल्याने त्यात पुरेसा प्रकाश नसेल. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्पात अडथळ्याचे प्रयत्न!

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आहे. तसेच दोन्ही इमारतींच्या खिडकीपर्यंतचे अंतर २५ ते ४५ फुटांपर्यंत आहे. सुसज्ज असा हा प्रकल्प असून रहिवाशांना भविष्यात अशा कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नसल्याचे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच बीडीडी पुनर्वसन प्रकल्प हा नागरिकांचे जीवनमान उंचावणारा आहे. रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळाले आहे. त्यामुळे काही लोक प्रकल्पात अडथळा आणण्यासाठी आरोप करत आहेत, असे अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07699 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top