
महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलासा नाहीच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महाविकास आघाडीमधील नेत्यांना सरसकट कठोर कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने नामंजूर केला आहे. भाजपप्रणित केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे आणि आघाडीमधील नेत्यांवर राजकीय आकस ठेवून आरोप करत आहे, असे सांगणारी याचिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी हा अर्ज नामंजूर केला. अशाप्रकारे सरसकट संरक्षण देता येणार नाही. त्यासाठी कोणतेही ठोस प्रकरण दाखल केलेले नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे आरोप करत आहे आणि त्यांना खोट्या प्रकरणांत अडकवत आहे, असा दावा अर्जात केला होता. ज्या वेळी हा अर्ज न्यायालयात करण्यात आला, तेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. महाविकास आघाडीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख अटकेत आहेत; तर अन्य काही जणांची ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07707 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..