मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली
मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली

sakal_logo
By

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली : मूर्तीसाठी उंचीची मर्यादा नाही : सगळ्याच सणांवरील निर्बंध उठवले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता. २३ : कोरोना काळानंतरचे हे पाहिलेच वर्ष असून या वर्षात येणारे उत्सव आणि सण निर्बंधमुक्त साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारची ही भूमिका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेनेही गणेशोत्सवावरील विविध निर्बंध उठवले असून याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे.

यावर्षी कोरोनानंतरचा पहिलाच गणेशोत्सव असला तरी मुंबई महापालिकेने गणेशमूर्ती संदर्भात निर्बंध ठेवले होते. मात्र सरकार बदलल्यानंतर शिंदे सरकारने यावेळी सगळ्याच सणांवरील निर्बंध उठवले. यामुळे सगळेच सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. पालिकेने देखील यंदाच्या गणेशोत्सवासाठी व गणेश मूर्तींबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. तसेच घरगुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर २ फूट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ती देखील शिथिल करण्यात आली असून आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. असे असले तरी मूर्तींची उंची कमीतकमी ठेवावी यासाठी पालिकेद्वारे आवाहन करण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापलिकेच्या मंडप उभारणी बाबत उद्यान खाते, मालमत्ता खाते व खाजगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येणार आहे. यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच कृत्रिम विसर्जन स्थळी मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आगमन व विसर्जन रस्त्यांवर संबंधित वीज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्थतेबाबत संबंधित विभागीय सहा. आयुक्त यांच्यास्तरावर चर्चा करून आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार आहे.

बॉक्स
परवाना शुल्कही माफ
सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या परवानगीसाठी आकारले जाणारे १०० रुपये शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. ज्या गणेश मंडळांनी मंडपांच्या परवानगीकरीता शुल्क भरले असेल अशा मंडळांना त्यांचा परतावा मिळणार आहे. मूर्तिकारांच्या मंडपांकरिताचे अग्निशमन अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणारे शुल्क ही पूर्णपणे माफ करण्यात येणार असून ज्यांनी शुल्क भरले त्यांना त्याचा परतावा मिळणार आहे.


....

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07714 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top