शाळेतील शिपाई पदासाठी धोरण आणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेतील शिपाई पदासाठी धोरण आणा
शाळेतील शिपाई पदासाठी धोरण आणा

शाळेतील शिपाई पदासाठी धोरण आणा

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील शिपाई हे पद शाळांची निकड लक्षात घेऊन ते भरणे आवश्यक असते. मात्र मागील काही वर्षांत हे पद भरले जात नाही. काही खासगी कंपन्यांच्या लाभासाठी त्या पदावर घाला घालण्यात आला आहे. त्यामुळे हे पद बाद करण्यासाठी ठाकरे सरकारच्या काळात काढण्यात आलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे. तसेच शिक्षक परिषदेकडूनही शिपाई हे पद शाळांना पूर्वीप्रमाणे देण्यासाठी नवे धोरण आणावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२० रोजी एक जीआर काढून सरकारी, अनुदानित शाळांतील शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाई कर्मचारी, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर आदी चतुर्थश्रेणी पदे बाद करण्याचे धोरण आणले होते. त्यामुळे राज्यातील विशिष्ट घटकातील शेकडो तरुण त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून दूर लोटले गेले.

शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार नागो गाणार, आमदार कपिल पाटील यांच्यासह इतरही आमदारांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. मात्र शिक्षण विभागाने हा विषय रेटून नेला होता. गोरगरीब आणि उपेक्षित घटकातील तरुणांना न्याय मिळावा आणि दुसरीकडे शैक्षणिक कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी शिपाई आणि त्यासोबत अन्य पदे बाह्य संस्थांच्या माध्यमातून न भरता शिक्षण विभागाकडून भरली जावीत, अशी मागणी शिक्षक आमदार गाणार यांनी केली आहे.

शिंदे सरकारने चूक दुरुस्त करावी!
राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिपाई आणि शिक्षकेतर ही पदे रिक्त आहेत. हे पद शाळांसाठी महत्त्वाचे असल्याने ते पूर्वीप्रमाणे भरण्यासाठी शिंदे सरकारने मागील काळात करण्यात आलेली चूक दुरुस्त करून राज्यातील शाळांना शिपाई हे पद उपलब्ध व्हावे यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा आणि ठाकरे सरकारच्या काळातील जीआर रद्द करावा, अशी मागणी शिक्षक आमदार गाणार यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07720 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..