वर्षा पुनरागमनाने पाणीसाठा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा पुनरागमनाने पाणीसाठा पूर्ववत
वर्षा पुनरागमनाने पाणीसाठा पूर्ववत

वर्षा पुनरागमनाने पाणीसाठा पूर्ववत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : पावसाने मागील आठवड्यात शहरासह तलाव क्षेत्रातही दडी मारल्याने मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा साधारण १० हजार दशलक्ष लिटरने घटला होता. मात्र शनिवारी पावसाने पुनरागमन केल्याने तलाव क्षेत्रातील पाणीसाठी पुन्हा वाढला असून गेल्या २४ तासांत १०,९०५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाल्याने पाणीसाठ्याची स्थिती पूर्ववत झाली आहे.

मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता लवकरच मिटेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आठवडाभर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने तलावातील पाण्याची पातळी पुन्हा एकदा कमी होऊ लागली होती. या दरम्यान जवळपास १० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा घटला होता. त्यामुळे शुक्रवार सकाळपर्यंत ८७.६५ टक्क्यांपर्यंत जलसाठा कमी झाला होता. तर शनिवारपर्यंत ८८.५९ टक्के इतका म्हणजे १२,६८,६५६ दशलक्ष लिटर जलसाठा होता. मात्र शनिवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा आगमन केल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली.

तलाव परिसरात शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तलावांतील पाणीसाठा पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत पाणीसाठा १२,७६,५६३ दशलक्ष लिटर म्हणजेच ८८.२० टक्क्यांवर पोहोचला. पाणीसाठ्यात १०,९०५ दशलक्ष लिटरची पुन्हा वाढ झाल्याने तलावांतील पाणीसाठा पूर्ववत झाला असून मुंबईकरांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबरपर्यंत पाऊस आवश्यक
मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, मोडक सागर, तानसा, भातसा आणि विहार या सात तलावातून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईसाठी वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ इतका पाणी साठ्याची गरज असते. यासाठी साधारणता सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणे आणि पाणीसाठा कायम असणे गरजेचे असते. सध्या पाऊस सुरू असून पाणीसाठा वाढत असल्याने मुंबईकरांची चिंता काहीशी कमी झाली आहे.

दोन वर्षातील पाणीसाठा
२४ जुलै २०२२ - ८८. २० टक्के
२४ जुलै २०२१ - ६२.७९ टक्के

उपलब्ध जलसाठा (रविवार सकाळपर्यंत)
तलाव जलसाठा टक्के
अपर वैतरणा - १८८८९८ - ८३.२०
मोडक सागर - १२८९२५ - १००
तानसा - १४४९४६ - ९९.९१
मध्य वैतरणा - १८५९३२ - ९६.७
भातसा - ५९९१२३ - ८३.५६
विहार - २०६९३ - ७४.७१
तुलसी - ८०.४६ - १००

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07733 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..