कवी काळसेकर यांच्या ''निरंतर''चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवी काळसेकर यांच्या ''निरंतर''चे प्रकाशन
कवी काळसेकर यांच्या ''निरंतर''चे प्रकाशन

कवी काळसेकर यांच्या ''निरंतर''चे प्रकाशन

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : समृद्ध आयुष्य जगताना कवी सतीश काळसेकर यांना माणसाविषयी कणव आणि जिव्हाळा होता. साहित्यावर आणि माणसावर प्रेम करणारे विलक्षण ते व्यक्ती होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी केले. कवी सतीश काळसेकर यांनी लिहिलेल्या आणि आत्तापर्यंत अप्रकाशित राहिलेल्या कवितावरील ''निरंतर'' या कविता संग्रहाचे आणि त्यांच्यावरील ''विस्मरणापल्याड'' स्मृतिग्रंथाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी डांगळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी, वसंत पाटणकर, उदय नाडकर आणि नितीन रिंढे आदी उपस्थित होते.

कवी सतीश काळसेकर स्मृतिजागरतर्फे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. ''विस्मरणापल्याड'' सतीश काळसेकर स्मृतीग्रंथ हा ग्रंथ लोकवाङमय गृहाने तर ''निरंतर'' हा कविता संग्रह ,पपायरस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. डांगळे पुढे म्हणाले की, चळवळीच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. जगणं म्हणजे काय हे सतीश यांच्याकडून शिकावे, असेही ते म्हणाले. काळसेकर यांच्या''एका काळोखाच्या भिंतीने आपण आवळत चाललोय...'' या कवितेतील ओळी वाचून आपण सर्वांनी काळसेकर यांच्या जगण्यातील मूल्य घेऊन पुढे जाऊ या, असे आवाहन डांगळे यांनी केले.

वसंत पाटणकर म्हणाले की, काळसेकर यांच्या कविता या मानववादी परंपरेतील आहेत. सामान्य माणसाच्या व्यथा वेदना कवितेतून व्यक्त होताना दिसतात. सर्व सामान्य माणसाबद्दल त्याला आस्था होती. ते जसे होते, तशाच त्यांनी कविता केल्या. तर डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले सतीश याने आपली कलादृष्टी लोकवाङमयसाठी वापरली. ते मनुष्यकेंद्री आणि जीवनाचा रस घेणारा कवी होते.

नितीन रिंढे यांनी ''विस्मरणापल्याड'' या पुस्तकावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याताई काळसेकर यांनी समितीकडून पुस्तकाचा संग्रह भेट दिला. विद्याताई यांच्या माध्यमातून दक्षा काळसेकर यांनी या वेळी काळसेकर यांच्या आठवणी सांगितल्या.. कोल्हापूर विद्यापीठात दोन नवे पुरस्कार सुरू होतील आणि साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि दिशा पिंकी शेख यांना ऑगस्टमध्ये काळसेकर यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

लाखभर रुपयांची पुस्तक खरेदी
सतीश काळसेकर यांनी संग्रहित केलेली जवळपास दोनशे पुस्तके वाचनप्रेमींनी घेतली. ही विक्री होऊन त्यातून तब्बल १ लाख ४० हजार रुपयांची खरेदी झाली. यामध्ये सर्वाधिक कांदबरी, चरित्र, आत्मचरित्र, कथा, कविता, समीक्षा, नाटक आणि विविध राजकीय विषयातील इंग्रजीतील सर्वाधिक पुस्तके होती. त्यासोबतच मराठीतीलही अनेक पुस्तके दोन दिवसांत खरेदी करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07734 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top