‘स्पा’वरील छापेमारीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पा’वरील छापेमारीबाबत
मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी!
‘स्पा’वरील छापेमारीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी!

‘स्पा’वरील छापेमारीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी!

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मॉरल पोलिसिंगच्या (नैतिक धोरण) नावाखाली पोलिसांकडून स्पा पार्लरवर होणाऱ्या छापेमारी विरोधात स्पा पार्लर चालक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राज्य सरकारने अशा छापेमारीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
वेलनेस वेल्फेअर असोसिएशनचे वतीने ॲड. शाश्वत आनंद, ॲड. सिद्धार्थ नाईक आणि ॲड. पंकज कंधारी यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. मॉरल पोलिसिंगच्या नावाने अनेकदा पोलिस स्पा पार्लरमध्ये धाड टाकतात. अनेक वेळा त्यांना मिळालेली टीप बोगस असते; मात्र या धाडीमुळे स्पा पार्लरची प्रतीमा खराब होते, तेथील कर्मचारी आणि चालकांबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो आणि त्याचा परिणाम व्यावसायिक पातळीवर होत असल्याची तक्रार याचिकेत केली आहे. तसेच यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना नाहक बदनामीचा सामना करावा लागत असल्याचेही याचिकेत नमूद केले आहे. न्यायालयाने याची दखल घ्यावी आणि एक विशेष समिती नियुक्त करावी, या समितीने अशा छापेमारी बाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---
याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
पोलिसांकडून धाड टाकण्यात आलेल्या संबंधित स्पा पार्लरचे नाव प्रसिद्ध करू नये, अशी मागणीही यामध्ये केली आहे. ज्या व्यक्ती अशी खोटी तक्रार करतात, ते सामाजिक सेवेच्या आडून हप्तेखोरी करत असतात. त्यांना हप्ता न दिल्यामुळे अशा बोगस तक्रारी केल्या जातात, असा दावा याचिकेत केला आहे. याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07743 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top