अग्निशमन दलातील भरतीच्या जाहिरातीला फसू नका : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमन दलातील भरतीच्या जाहिरातीला फसू नका :
अग्निशमन दलातील भरतीच्या जाहिरातीला फसू नका :

अग्निशमन दलातील भरतीच्या जाहिरातीला फसू नका :

sakal_logo
By

अग्निशमन दलातील
भरतीची जाहिरात खोटी
प्रतिसाद न देण्याचे आवाहन

मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये ‘अग्निशामक’ संवर्गातील एकूण ७७४ पदांकरिता सरळसेवा पद्धतीने भरती होणार असल्याची जाहिरात आणि माहिती विविध समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये सरळसेवा पद्धतीने भरती होणार असल्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित जाहिरात व त्यातील माहिती खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीस प्रतिसाद देऊ नये. नागरिकांनी अशा खोट्या आशयास बळी पडू नये, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी केले आहे. संबंधित जाहिरात व माहिती केवळ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असा खुलासा पालिकेने केला आहे. अशी जाहिरात किंवा माहिती कोणालाही फॉरवर्ड करू नये. ज्यांना माहिती पाठवली असेल, त्यांनाही ती खोटी असल्याचे कळवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07756 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..