आयआयटीतील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटीतील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
आयआयटीतील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

आयआयटीतील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : आयआयटी मुंबईने केलेल्या शुल्कवाढी विरोधात गेल्या सहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता विविध संघटनांचाही पाठिंबा मिळत असल्याने येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयआयटीतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आज मुख्य प्रवेशद्वारासमोरच आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. तसेच आयआयटी संकुलातील बारा ठिकाणावरही विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शुल्कवाढीचा निषेध व्यक्त केला. आयआयटी प्रशासनाने ही शुल्कवाढ कमी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. दरम्यान, आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांसोबत खुली चर्चा करून या संदर्भातील तोडगा काढण्याचे आश्वासन चार दिवसांपूर्वी देण्यात आले होते, मात्र आतापर्यंत त्यासाठी कोणतेही लेखी आश्वासन आम्हाला दिले नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07758 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..