याचिका रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टीची न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

याचिका रद्द करण्यासाठी
शिल्पा शेट्टीची न्यायालयात धाव
याचिका रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टीची न्यायालयात धाव

याचिका रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टीची न्यायालयात धाव

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : सन २००७ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात दाखल झालेला चुंबन प्रकरणातील गुन्हा रद्दबातल करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी शिल्पाने आता सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
१५ वर्षांपूर्वी राजस्थानमधील एका कार्यक्रमात हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअरने शिल्पाला मिठी मारून चुंबन करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी स्थानिक अलवार पोलिस ठाण्यात शिल्पाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजस्थानमधील मुंदावर महानगर दंडाधिकारी न्यायालयात यावर सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने शिल्पाला दोषमुक्त केले आहे; मात्र तक्रारदारांनी या निर्णयाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले. मुळात या घटनेत मीच पीडित आहे. तसेच तक्रारीमुळे मला मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागल्याने संबंधित अपील याचिका नामंजूर करण्याची मागणी शिल्पाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07777 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..