‘बेस्ट’ हरित क्रांतीच्या वाटेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बेस्ट’ हरित क्रांतीच्या वाटेवर
‘बेस्ट’ हरित क्रांतीच्या वाटेवर

‘बेस्ट’ हरित क्रांतीच्या वाटेवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : बेस्ट प्रशासनाने भविष्यात जास्तीत जास्त हरित ऊर्जेचा वापर करण्याचा निर्धार केला आहे. प्रदूषण पातळी खाली आणण्यासोबतच विजेची बचत करण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासन त्याद्वारे करणार आहे. भविष्यात ७०० मेगावॉट हरित ऊर्जा वापरणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोट्यवधी रुपये तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाची वाटचाल डिजिटलच्या आणि आता हरितक्रांतीच्या दिशेने होत आहे. बेस्ट उपक्रम भविष्यात ७०० मेगावॉट हरित ऊर्जेचा वापर करणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात नुकताच ‘बिजली महोत्सव’ पार पडला. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी त्याबाबत माहिती दिली. बेस्ट उपक्रम एका बाजूला परिवहन विभागाच्या बस प्रवाशांना डिजिटल सेवा आणि विविध सुविधा पुरवून सुखकर असा मिनी इलेक्ट्रिक गाड्यांमधून गारेगार प्रवास घडवत आहे. दुसरीकडे, बेस्टचा वीज विभाग आता हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, ७०० मेगावॉट हरित ऊर्जेचा वापर असेल.

वीजपुरवठ्याची माहिती मेसेजद्वारे
जर काही कारणास्तव बेस्टचा वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहक काहीसे चिंतित होतात. वीजपुरवठा का खंडित झाला, वीज कधी येणार, किती वेळ लागणार आदी प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. मात्र, आता बेस्टचा वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास त्याबाबत ग्राहकांना बेस्टकडून तत्काळ मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. वीजपुरवठा पूर्ववत होण्याबाबतची माहितीही मेसेजद्वारे दिली जाणार आहे.

नफ्यासाठी नवे तंत्रज्ञान
बेस्टचा विद्युत विभाग शहर भागातील आपल्या १० लाख ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करीत आहे. १० लाख वीज ग्राहकांमध्ये आठ लाख निवासी व दोन लाख व्यावसायिक ग्राहक आहेत. बेस्ट उपक्रम सध्या कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असला, तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे.
.......

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07782 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..