अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांकडून आडमुठी भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांकडून आडमुठी भूमिका
अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांकडून आडमुठी भूमिका

अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांकडून आडमुठी भूमिका

sakal_logo
By

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडून आडमुठी भूमिका

स्वतःच घेत आहेत सुरक्षेची हमी : केवळ ३५ कुटुंबांनी घरे सोडली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : मुंबईतील २१ उपकरप्राप्त इमारती ह्या म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींमधील काही नागरिकांनी स्वतःहून पर्यायी वास्तव्याची व्यवस्था केली आहे; तर म्हाडाने ३५ कुटुंबीयांना संक्रमण शिबिरात हलविले आहे. मात्र अनेक कुटुंबीयांनी धोकादायक इमारतींमधून बाहेर न पडण्याची आडमुठी भूमिका घेतली आहे. या नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची हमी देणारे शपथपत्र म्हाडाला दिले आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकरप्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. मंडळामार्फत दर वर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. यंदा यामध्ये २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या इमारतींमधील ६७४ निवासी व २६६ अनिवासी असे एकूण ९२३ रहिवासी आहेत; तर १९० निवासी रहिवाशांनी स्वतःच्या निवासाची पर्यायी व्यवस्था केली आहे; तर म्हाडाने ३५ कुटुंबीयांना संक्रमण शिबिरात पाठवले आहे. पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका असतानाही अनेक रहिवासी जीवावर उदार होऊन घर रिकामे करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
म्हाडाच्या सी वॉर्डमधील काळबादेवी येथील जॉली चेंबर या धोकादायक इमारतीमधील ८४ कुटुंबीयांनी घरे रिकामी करण्यास विरोध केला आहे. इमारत जीर्ण झाली असतानाही ती रिकामी करण्याऐवजी कुटुंबीयांनी स्वतःच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. यामुळे म्हाडा अधिकारीही पेचात पडले आहेत.
--------------------------
चौकट -
अतिधोकादायक इमारतींमधील नागरिकांना नोटीस देण्यात आल्या आहेत; तर एका इमारतीमधील नागरिकांनी शपथपत्र देऊन स्वतःच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. सुरक्षेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, आरआर मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07785 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top